नेहमीसारखी गप्प ती राहिली
पण मला आज़ सामील झाली खळी
छान आहे हे!
गुप्तहेरी कुणी आज़ केली अशी?
भृंग भांबावला, हासली पाकळी
हेही छान आहे
काय वेणीतली ती फुले बोलली?
लाज़ली का अशी मोगऱ्याची कळी?
ही कल्पना स्पष्ट कराल का?
का विषय काढता इंद्रियांनो असे?
प्रीत माझी तिची सोवळी सोवळी
विषय या शब्दावर श्लेश असल्याने ओळ अर्थपूर्ण होते.( असे मला वाटते, चू. भू. द्या. घ्या. )
हूड वाऱ्यासवे शीड हे भेटले
रात्रही वादळी ! भेटही वादळी !
क्या बात है!
'मी प्रवासी ज़री विश्व हे व्यापले
सोबतीला उरे शेवटी पोकळी'
...त्वं मूलाधारस्थितोसि नित्यम्...!
आपली काव्यप्रतिभा भावली.
-अ