प्रवासी,
छान गझल! कधी कधी तुमच्या गझलांमधील शेरांमध्ये दडलेले अर्थ उलगडून दिसले कि, मन अवाक होते. दोन ओळींमध्ये किती गहन अर्थ मांडू शकतात गझलाकार! खूप आश्चर्य वाटून जाते.
शोध घेते नज़र का अशी वेंधळी?
मी कुठे वेगळा? तू कुठे वेगळी?
पापण्यांनो ज़रा दूर घ्या ओढणी
होउदे ना दिठी मोकळी मोकळी
हूड वाऱ्यासवे शीड हे भेटले
रात्रही वादळी ! भेटही वादळी !
हे शेर सहज उमगले आणि आवडलेही.