आपली लेखमाला आवडली. मनोगतावर सर्व रसांचा आस्वाद घेता येतो हे आमचे भाग्यच म्हणायचे. पुढील लेखांसाठी शुभेच्छा.

एक शंका-

नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥

नामाच्या द्वारे ज्याची वृत्ती विष्णुरूप झाली अशा वैष्णवालाच या नामामृताचे सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते.

वैष्णवच का? ज्ञानेश्वरांनी वैष्णव शब्द जाणीवपूर्वक वापरला असावा. भक्तीमार्गात आणि त्यातही नामस्मरणात वैष्णव-शैव भेद असण्याचे काय कारण असावे?

-अ