पाककृती वाचून तोंडाला पाणी सुटले पण निदान उद्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंत तरी तोंडावर आवर घालावा लागणार आहे.
टीपा एकदम कागदी पोह्यांसारख्या चुरचुरीत !! दडपे पोह्यात खरंच वरून फोडणी घातली तर छान चव येते. आम्ही मसाला न घालता नुसतेच कांदा टोमॅटो , ओला नारळ, चवीनुसार मीठ, साखर आणि कोथंबीर चिरून घालून पोह्यांना हिरव्या मिरच्यांची फोडणी देतो. किंवा दुसऱ्या प्रकारात दही, पोहे, तिखट, मीठ, मसाला ,साखर असे करतो. पण आता तुम्ही सांगितलेली मिश्र पद्धत करून पाहीन.
अनु , दुव्याबद्दल धन्यवाद. पण दोन्ही कृती खूप वेगळ्या आहेत गं फारतर या कृतीचे नाव दडपे पोहे - २ यासारखे काहीतरी ठेवायला हरकत नाही.