समीर....
कृती छान आहे दडप्या पोह्यांची ! एक गोष्ट अजून पटली - दुपारी ४ ते ६.३० च्या मधल्या वेळेतलेच हे खाणे आहे.
काही पदार्थ एकदम स्पेसिफीक वेळेलाच बरे लागतात. उदा. कांदा-बटाट्याची भजी वा पावभाजी सकाळी ७.३० वाजता खाणे मनाला पटत नाही- वडापाव रात्री १०वाजता (खाणारे खातात) असो....
ह्यांत नारळ खोवून टाकावा असे माझे मत आहे. किंचीत आंबटपणा हवा असेल व दही नको असल्यास लिंबू पिळावे. 
अनु,
पोह्यांचे २१ प्रकारचे पदार्थ (मी जरा लिमीट मध्ये फेकतो) करता येतील इतका पदार्थ वैवीध्यपूर्ण आहे- वांगी पोहे, बटाटा पोहे, कांदा पोहे, कोळाचे पोहे, दडपे पोहे, दही पोहे, दुधपोव्हा (गुज्जू) शेव-पोहे, बुंदी-पोहे व पोहे-पापड हे पटकन आठवतात ते लिहीले.