माननीय "अ",
ज्ञानदेव हरिपाठात "हरी" संबंधीच लिहिणार अभिप्रेत आहे. त्याकाळी शैव / वैष्णव असे दोन पंथ होते. त्यामधील वादही आपल्याला माहीत आहे. अभंग २ च्या निरूपणात "एक हरि आत्मा जीवशिवसमा" ह्या ओवीवर लिहिताना ह्यासंबंधी लिहिले आहेच. ह्या अभंगातही "आत्मा जो शिवाचा रामजप" हे आलेच आहे. महाराष्ट्रात त्याकाळी वैष्णवपंथीय अधिक असावेत. ज्ञानदेव वैष्णवपंथीय असावेत असे वाटते.
            के.वि.बेलसरे ह्यांनी वैष्णव ह्या शब्दाचा अर्थ भगवंताचा भक्त असा दिला आहे. तो मला इतका भावला नाही. तसे धर्मशास्त्रांत अनेक देवता मानल्या आहेत. भक्तीच्या सुरुवातीस हे वेगळेपण असणारच. भेद आहे तो उपासनेच्या पद्धतीत. अंतिमता "एक हरि आत्मा जीवशिवसमा" ह्याचा प्रत्यय येतोच. रामायणात तर.. राम शंकराची उपासना करतात,तर शंकर रामजप करतात असा उल्लेख आढळतो. सेतू बांधतानाची रामेश्वरम् ची कथा लक्षात घ्या. "जैसा ज्याचा अधिकार । तैसा करू उपदेश" हा अभंगही लक्षात घ्यायला हरकत नसावी.

ज्ञानोत्तर भक्तीत द्वैतभाव नसतो आणि शैव / वैष्णव हे भेदही राहत नाहीत असे वाटते.