मीराताई,

खूपच उशीरा देत आहे प्रतिसाद. सगळे लेख वाचले. खूप आवडले.

महाविद्यालयात असताना आम्हाला फिबोनाची, पास्कल चा त्रिकोण, हनोई चा मनोरा,  आठ राण्या (eight queens) असे अनेक प्रोग्रॅम्स करायला होते. फिबोनाची आणि पास्कल चा त्रिकोण त्यातल्या त्यात सोपे होते. आणि ती मालिकाही शिक्षकांनी समजावली होती. पण बाकीचे जे प्रोग्रॅम्स होते त्याची फक्त नावेच शिक्षकांनी सांगितली होती. कोणालाही काहीही माहीत नव्हते अगदी आमच्या सिनिअर्स ना सुद्धा. मग काय वर्षानुवर्षे सिनिअर्स कडून जर्नल्स घेऊन प्रोग्रॅम्स कॉपी करणे  हेच चालत होते. मग बऱ्याच वर्षांनी कधीतरी मधे माहितीजालावर फिबोनाची मालिका हे मिळाले. आणि त्याची 'ऍप्लिकेशन्स' वाचून अक्षरशः थक्क झाले. मग 'गूगल' वरून बाकीचेही शोधून काढले. आणि त्यावेळेस वाटले की हे सगळे तेव्हाच समजले असते तर कदाचित मी स्वतः ते प्रोग्रॅम्स लिहायचा प्रयत्न केला असता. आणि कदाचित मला परिक्षेमधेही चांगले गुण मिळाले असते !

मीराताई तुम्ही हा उपक्रम हाती घेतला आहेच तर कृपया या सगळ्याची रोजच्या जीवनातली 'ऍप्लिकेशन्स' (प्रतिशब्द सुचत नाही) ही समजावून सांगा. अजून मजा येईल.