मिलिंदराव,

छान गझल.

का जुन्या वाटेकडे, ग, पाउलें वळली पुन्हा
का तुझे-माझे नव्याने पाय घसरू लागले

खास!!

आडपडदा फेडण्याचा व्यर्थ का आटापिटा
सावल्यांना चेहऱ्यांचे साज सजवू लागले

यातली कल्पना विशेष आवडली.

सांग गुंता जीवनाचा वाढला इतका कसा
एक उत्तर शेकड्याने प्रश्न प्रसवू लागले

निव्वळ अप्रतिम.

खूपच छान गझल. अभिनंदन आणि शुभेच्छा.