ह्या पोह्यात गाजर (किसलेले), फ्लॉवर-कोबी (बारीक चिरून), मटार घातले तर त्याची लज्जत आणखी वाढते, शिवाय भाज्या खाल्ल्या जातात. ह्या भज्या कच्च्या घातल्या तरी छान लागतात (अशावेळी मटार मात्र थोडे वाफवून घ्यावे), पण मोहरीच्या फोडणीत किंचित परतून घातल्या तर विचारूच नका. आईला सांगितलेच पाहिजे आता पोहे करायला!!!
तळ टीप - लहान मुलांना भाज्या खाऊ घालायचा हा एक चांगला मार्ग आहे. शिवाय वर सांगितलेल्याच भाज्या घातल्या पाहिजे असे नाही, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकता.
~ मैथिली