वा मिलिंदराव, सुंदर आहे गझल!
सूर्य अव्हेरून बसले जे तमाचे पाठराखे
पाहिले मी काजव्यांशी सूत त्यांना साधताना
वावा! मस्त आहे हा शेर
ग्रहण नाही, अवस नाही, चंद्र पाहावा कसा पण
कुंतलांचा रुष्ट पडदा पौर्णिमेला ग्रासताना
फार नव्हते मागणे अन् तोषली होतीस तूही
लाजलो, संकोचलो का हात सखये मागताना
आहा! छान!
मक्ता सुरेख आहे.
आपला,
(गझलवाचक) शशांक