मानसराव,

गझल चटका लावणारी आहे. काही शेर वाचून तर अंतर्मुख व्हायला होतंय. मतल्यापासूनच याची नांदी झालीये.

शेवटी आलात सवडीने, सुखांनो हाय पण,
 झाकला आहे फुलांनी, आज माझा चेहरा!

हे फार लागले. आणि त्यानंतरचा दर्पणाचा शेरसुद्धा असाच!

जपुन आहे सल अनामिक, गूढगर्भी अंतरी,               
एकदा त्या मज दिसावा, वेदनेचा चेहरा!

अवाजवी अपेक्षा ?(!)

वेसणीतील देह हे, अन दडपणाची नांगरे,

ही कल्पना फार आवडली. छान गझल. अभिनंदन आणि शुभेच्छासुद्धा!!

मक्ता एकूण संदर्भांच्या आणि बाकीच्या शेरांच्या तुलनेत जरा दुबळा वाटतो आहे का? अर्थात, हे वैयक्तिक मत झाले, चू. भू. द्या. घ्या.