मला वाटते इथे "जाणीव" शब्दाचा अर्थ आपण व्यवहारात वापरतो तसा नाही.
होय. आपण व्यवहारात वापरतो तसा अर्थ अभिप्रेत नाही. पण आपल्याला अव्यक्ताची भाषा समजण्यासाठी व्यक्ताचाच आधार घ्यावा लागतो. ब्रह्म, चैतन्य, आत्मा हे शब्द समानार्थी वापरलेले असतात.
मी बऱ्याच वर्षांपूर्वी योगवसिष्ठ वाचले होते. theory of relativity खूप छान समजाविले आहे त्यात. तसेच काहीसे शब्दांच्याबाबतीत होते.एका मर्यादेपर्यंतच शब्दांची साथ असते. नंतर अनुभूतीशिवाय सत्याला पर्याय नाही.
आपल्या प्रतिसादामुळे आज माझ्याही समजण्यात भर पडली. कथेतील बोध आवडला. ह्याबाबतीत रामकृष्ण परमहंसाचे उदाहरण तर अधिकच बोलके आहे.