बेळगाव महाराष्ट्रात विलीन झाल्याचा ठराव बेळगाव महापालिकेत बहुमताने
संमत झाला, पण त्याला वैधानिकदृष्ट्या काहीही महत्त्व नाही. तो एक
प्रतिकात्मक ठराव होता, महाराष्ट्राच्या निद्रिस्त प्रशासनाला जाग
आणण्यासाठी. पण नेहमीप्रमाणेच त्यांच्या वाट्याला महाराष्ट्रीय
नेत्यांतर्फे (पर्यायाने जनतेतर्फे) उपेक्षा आणि कर्नाटक शासनातर्फे
रोष/गळचेपी आली. समस्त मराठी समाजाच्या दृष्टीने अतिशय शरमेची गोष्ट आहे.
आपला,
(व्यथित) शशांक