नमस्कार,

आपण अतिशय महत्वाचा विषय निवडला आहे.

मला वाटते की सर्वप्रथम आपण सर्वांनी मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आवर्जुन मराठीतच बोलले पाहिजे. समोरच्या माणसाला मराठी बोलता येत असेल तर उगाचच दुसरी भाषा का वापरावी?

ऑफ़ीसमध्ये पण अनौपचारिकरित्या शक्य असल्यास मराठीतुन बोलावे.

तसेच आपली मुले इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर जाणीवपूर्वक

त्यांना चांगली मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्यासाठी द्यावी. मराठीतुन पत्रं लिहावयास सांगावे.चांगले मराठी चित्रपट, नाटके दाख़वावीत.चांगली मराठी गाणी ऐकवावीत.

मराठी भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी  अशी सुरवात करता येईल

असे मला वाटते. 

धन्यवाद,

सौ. शिल्पा (शिल्प्स)--