मृदुला,

खांडवीसाठी पाणी दुप्पट घेणे, म्हणजे रवा चांगला शिजतो व वड्या मऊसर होतात. वाफ २-३ मिनिटांनी काढावी. वाफ काढणे म्हणजे पातेल्यावर झाकण ठेवून गॅस मंद ठेवणे (२-३) मिनिटे. नंतर झाकण काढले असता पदार्थ शिजताना पाण्याची वाफ होते, म्हणजे वाफेवर शिजणे. चु. भु. दे. घे.

सुखदा,

खांडवीची पाक कृती आवडली. खांडवी ही  वऱ्याच्या तांदुळाचीच जास्ती चांगली लागते. मला खांडवी खूप आवडते. लवकरच करुन पाहीन. साखरेच्या ऐवजी गूळ घालून केलेली खांडवी जास्ती खमंग आणि चविष्ट लागते. साजुक तुपाबरोबर खायला छान लागते. तांदुळाच्या रव्याची पण खांडवी करतात.

रोहिणी