1. शक्यता-१ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर आहे. उदा. चिंटू लोकसत्तेच्या संकेतस्थळावर आहे. 
    =================================
    1. चित्रावर आपल्या उंदराचा उजवा डोळा मिचकवा ("राईट क्लिक") -> प्रॉपर्टीज वर टिचकी मारा
    2. नवीन उघडलेल्या (प्रॉपर्टीजच्या) खिडकीतून चित्राची जागा (Address/URL) कॉपी करा
      ============================
  2. शक्यता-२ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर नाही (कदाचित तुमच्या संगणकावर आहे)
    =================================
    1. असे चित्र उपलब्ध करून देण्यासाठी ते आधी जालावर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी flickr किंवा तत्सम सेवादात्यांचा वापर करावा.
    2. चित्रे जालावर उपलब्ध झाली की 1.1 आणि 1.2 मध्ये सांगितल्याप्रमाणे चित्राची जागा कॉपी करून घ्या
      ============================
  3. चित्र जिथे चिकटवायचे आहे त्या ठिकाणी ("HTML फेरफार" मध्ये जाऊन) खालील प्रमाणे टाइप करा.
    <img src="चित्राची आधी कॉपी केलेली जागा (URL)">
    ==================================
    उदा. आजचा चिंटू देण्यासाठी
    <img src="http://www.loksatta.com/daily/20051121/chinn.jpg"> असे "HTML फेरफार" मध्ये लिहायचे.
    किंवा flickr वर चित्र अपलोड केले असेल तर तिथला त्याचित्राचा दुवा द्यायचा, जसे
    <img src="http://static.flickr.com/33/65815863_a6ae91bb2e.jpg">
    ==================================
    मग असे दिसते.
    ==================================
==================================
आपला,
(माहितीदाता) शशांक
=====================================