भाष व महेश, धन्यवाद.

थंडर साठी मेघगर्जना चांगला शब्द आहे. थंडरक्लाउड साठी गर्जनाकारी मेघ असा शब्द भाषकाकांनी सुचवला तोही चांगला आहे.

थंडरस्टॉर्म ला काय म्हणावे? गडगडाटी वादळ? गर्जनाकारी वादळ? इतर काही?

डिस्चार्ज साठी भाषकाकांनी उत्सर्जन/उत्सारण हा शब्द सुचवला. मात्र निःसारण ही चांगला वाटतो आहे. इंग्रजी-तेलुगु शब्दकोशामध्ये डिस्चार्ज साठी विसर्जन/उत्सर्ग असे शब्द सापडले. त्यामुळे उत्सर्ग - उत्सर्जन - विसर्जन - निःसारण ह्यापैकी जास्त योग्य शब्द कोणता असावा हे ठरविण्यासाठी कृपया मदत करा.