सोनाली,
'युगंधर'ची छोटी आवृत्ति फारच छान जमते आहे. त्यात तुझी लेखन-शैलीही छान. खरच 'श्रीकृष्ण' (व्यक्ति) आणि 'महाभारत' (ग्रंथ) यावर कुणीही कितीही लिहिले वा वाचले तरी समाधान होतच नाही. बऱ्याच वेळा मी note केले की कोणीही कसल्याही विषयावर कीर्तन वा प्रवचन करीत असला तरी तोही 'श्रीकृष्णाला' एकदा तरी आणतोच. हे दोन्ही विषय असे आहेत की एका ठराविक चौकटीची मर्यादा सांभाळता आली तर ह्या दोन्ही विषयांना कसेही रंगवता येते.
तुम्ही काय काय वाचता त्यातले जे आवडते ते असे इतरांपर्यंत पोंचवत राहावे. श्रीकृण तुला उदंड लेखणी देवो. 'लेखणी' शब्द बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण काय म्हणायचे आहे ते कळले असेल अशी आशा करतो.