चिंटू माझा आणि माझ्या मुलीच्या आवडीचा विषय आहे. चिंटूचे खालील कार्टून माझी मुलगी दिवसातून एकदा तरी म्हणते अगदी परवचा म्हणावा तशी -
चिंटू - छे, अशक्य!
पप्पा - चिंटू, जगात अशक्य असे काहीच नाही.
चिंटू - मग ही बाहेर आलेली जास्तीची टूथपेस्ट जरा परत आत टयुब मध्ये घालुन द्या.
मला आता जसेच्या तसे आठवत नाही. तिलाच विचारायला पाहीजे.