प्रिय सोनालीमावशी
कै. शिवाजी सावंतंचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यांच्या शब्दांचं अचूक असं नेमकेपण तुझं रसग्रहण वाचताना प्रकर्षाने जाणवलं. सगळं पुस्तक वाचताना रोज पंचपक्वान्नांचा आस्वाद घेणाऱ्या राजाला दिवाळी माहीतच नाही अशी माझी अवस्था झाली होती. पण आज हे परत वाचताना तेव्हा वाचलेल्या गोष्टी निराळ्या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा जाणवतात. फारच सुरेख झाला आहे रसास्वाद.
--अदिती