धन्यवाद मंडळी.
आणि रोहिणीताई तुम्हाला विशेष धन्यवाद. कारण पाण्याचे प्रमाण मला काही सांगता आले नसते. मी आपले अंदाजानेच पाणी घेते.
प्रवासी महाशय, का कोणास ठाऊक पण आमच्याकडे ही खांडवी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शिऱ्याइतकी गोड कधीच केली जात नाही. आणि कदाचित तशी खायची सवय असल्याने शिऱ्याप्रमाणे गोड कल्पनाही करवत नाही. असो पण तुम्ही मात्र प्रमाण दिले आहे त्यापेक्षा जास्त साखर घाला बरं !
रोहिणीताई, तात्या,
गुळाची खांडवी हा प्रकार ऐकला आहे पण कधी खाल्ली नाही. आता करून बघेन थोडी. पण मला गुळाचा खरवस आवडत नाही त्यामुळे गुळाची खांडवी आवडेल की नाही सांगता येत नाही.