'चिंटू' मुळे वर्तमानपत्र शेवटच्या पानापासून वाचायची सवय जडली आहे ती काही केल्या जात नाही. सकाळ मधे चिंटू नसतो तरीही शेवटचे पानच आधी पाहिले जाते. पु. लं गेल्यावर चेहरा पाडणारा, जोशी काकूंना सतावणारा, आजी आजोबांकडे खेळण्याचा हट्ट करणारा, सतीश दादाची खिल्ली उडविणारा आणि गेल्या दहा पंधरा वर्षात वय न वाढलेला खट्याळ चिंटू खरंच अगदी प्रत्येकाच्या मनातला !

'चिंटू' ची निर्मिती करणाऱ्या त्या दोन महान कलाकारांना सलाम !