खरे आहे. निःसारण म्हटले की सरकारी कृपेने मलनिःसारणच आठवते. विसर्जन हा शब्द गणपती विसर्जन वा सभा विसर्जन ह्या अर्थी जास्त प्रमाणात वापरला जातो. उत्सर्जन/उत्सर्ग हे शब्द एमिशन साठी जास्त योग्य वाटतात.
जसे स्कॅटरिंग साठी विकिरण हा शब्द वापरला जातो तसा चार्ज म्हणजे प्रभार म्हणून डिस्चार्ज साठी विप्रभार वा तत्सम शब्द शास्त्रीय परिभाषेत वापरला जात असल्यास हवा आहे. नसल्यास विसर्जन हा शब्द मला जास्त योग्य वाटतो.
शब्द सुचवणीसाठी विनायक व नरेंद्र गोळेंचे आभार.
नवीन लेखमाला येऊ घातली आहे. आपण स्वागत तत्पर असल्याचे वाचून हुरूप आला.