संग्राहक,
आपन ज्या विषयाला वाचा फोडलीत तो विशय गहन आहे खरा. महाराष्ट्र म्हणजे फक्त शहरी भाग हे समीकरन काही जन घेऊन वागतात त्यावर माझा आक्षेप आहे.
ग्रामीन भागातली मते गोळा करून सत्ताधीश झाले की मग ग्रामीन भागाची उपेक्षा करून, स्वताचे आयुश्य शहरी भागात काढायचे व मुलाबाळांना शहरी भागातून वर आनायचे हे सगळ्यां राजकारन्यांचे परम कर्तव्य दीसते. ग्रामीन भागातली मानसे जरा पुढे जायला लागली की त्यांना हिनवत स्वताचे ग्यान पाजळायला पुढे येनारी मंडळी पावला गनीक दिसतात.
मध्यमवर्गाचे नियंत्रन मतपेटीवर यायला जन्म जाईल कारन, ग्रामीन भागात सर्वच गरीब जनता आहे तीथली मते जास्त आहेत जोवर त्यांचा विकास होत नाही तोवर महाराष्ट्राचे चीत्र बदलने कठीन आहे.
भ्रष्टाचार सगळीकडे आहे हे कबुल आहे पण ग्रामीन भागातला मानुस शहरी भागातल्या पेक्षा कमी भ्रष्ट आहे.
धन्यवाद-