कविता वाचताना मजा आली. 'हसा आणि लठ्ठ व्हा' ह्या न्यायाने वाचणाऱ्यांची पण जाडी थोडी वाढली असावी!
अदितीने उल्लेखिलेले शि.द.फडणीस यांचे चित्र मलाही आठवले.
कुठेतरी वाचलेली, आधी सडपातळ आणि आता लठ्ठ झालेल्या बाईची ही कबुलीही आठवली.
पूर्वी दुकानदार मला म्हणत, "बाई, साडी पूर्ण साडेपाच मीटर नाही, पण तुम्हाला पुरेल." आता म्हणतात, "बाई, साडी पूर्ण साडेपाच मीटर आहे, शिवाय ब्लाऊजपीस. पण तुम्ही तो काढू नका."