कुकीजसाठी इथे मिळणाऱ्या चिप्स कठीण असतात; त्या ओव्हनमध्ये मऊ होतात पण वितळत नाहीत. चॉकलेटच्या लाद्यांचा कीस वापरला तर तो वितळतो. पण कुकी गार होताना पुन्हा घट्ट होतो. त्यामुळे चालते. मला चॉकलेटचा पातळ कीस जास्त आवडतो, पण चॉकलेटप्रेमींना कदाचित तयार मिळणाऱ्या चिप्स जास्त आवडतील.