वा! सोनालीताई!
अतिशय सुंदर उतरली आहे हो गज़ल! भाषेतील सहज़ता, शब्दांचा समृद्ध वापर विशेष नोंद घेण्यासारखा.
रूप भासे निराळे तुझे...
आरशालाच होते चरे!
काय काट्यासही टोचले?
शब्द माझेच का बोचरे?
वादळामागुनी राहिले
आठवांचे खुळे कोपरे!
लागले ना रडावे कधी
ठेवले दुःख मी हासरे
हे चार शेर विशेष आवडले! छोटे वृत्त आपण फार छान निभावले आहे.
आपल्या गज़ललेखनास शुभेच्छा!
आपला
(आनंदित) प्रवासी