लागले ना रडावे कधी
ठेवले दुःख मी हासरे
वावा! लाजवाब मक्ता!! ज्यांनी अनुभवले असेल त्यांना या शेराची किंमत नक्कीच कळावी.
मतलासुद्धा सुंदर आहे.
श्वापदांना हवी का घरे?
पिंजरे माणसांना बरे!
मुंबईतील राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांनी मानवी वस्त्यांवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि त्या एकूणच ज्वलंत प्रश्नावर यातून उत्तम आणि परखड भाष्य झाले आहे असे वाटले. मनोगताप्रमाणेच सरकारदरबारीसुद्धा या शेराला (आणि बिबळ्यांनासुद्धा!!) न्याय मिळो ही अपेक्षायुक्त प्रार्थना. असो.
वादळामागुनी राहिले
आठवांचे खुळे कोपरे!
छान छान!!
छोटी बहर बहोत खूब निभाई है. मोहतरमा, अब आप भी हमारी बिरादरी में शामील हो गई. मुबारक हो!!
(शुभेच्छुक)चक्रपाणि