सुभाषराव,
अत्यंत उपयुक्त माहिती !
मीही थोडीशी भर घालू इच्छितो, वरून देण्यात येणाऱ्या फोडणीसाठी पूर्वी लोखंडाची पळी वापरली जायची. एखाद्या कढीला किंवा तत्सम द्रव पदार्थाला वरून फोडणी द्यायची झाल्यास त्यात आपण सांगितल्याप्रमाणे किंवा चवीनुसार साहित्य घालून पूर्ण पळी द्रव पदार्थात बुडवायची असते. हल्ली लोखंडाच्या पळीची जागा "सँडविच्ड बॉटम" म्हणजे आतून स्टील व बाहेरील बुडाकडील भाग तांबे ह्या धातूने केलेली असते. 
वरून फोडणी दिलेले बरेचसे पदार्थ चवीला अतिशय सुरेख लागतात. खास करून जर लोखंडाच्या पळीने (पूर्ण पळी डुबवून दिलेली) फोडणी असल्यास खासच लागतात असे माझे मत आहे.