भाष !!
वा मस्तच ! छान माहिती लिहिली आहे !!
माधवकाका,
लोखंडाच्या पळी बद्दल थोडे.. जेव्हा शक्य असेल तेव्हा लोखंडाची पळी वापरावी. कारण लोखंडाची पळी वापरल्याने फोडणी जास्त खमंग तर होतेच शिवाय शरीराला आवश्यक असणारे 'लोह' ही मिळते. लोखंडाच्या कढईत केलेल्या भाज्यांना काळपट रंग येत असल्याने शक्यतो अशा भाज्या कराव्यात ज्यांना काळपट रंग आला तरी चालतो. शिवाय लोखंडाच्या कढईतील भाज्या जास्त खमंग पण होतात. भेंडी, शक्यतो रंग टिकविण्यासाठी हिंडालिअम, ऍल्युमिनिअम मधे करतात पण तीच जर लोखंडाच्या कढईत केली तर खरंच खूप छान होते. आणि जरा चिकटपणाही कमी होतो (साध्या कढईमधे केलेली भेंडी, आमसूल घालूनही थोडी चिकट राहते. अशी माझी समजूत आहे हं )