जयन्तांचे शब्द बरोबर आहेत. मात्र रिडींग = निरीक्षण (वाचनही चालेल)

तो, प्रिफिक्स = पूर्वोपसर्ग आणि सफिक्स = उत्तरोपसर्ग

यावरून एक संस्कृत सुभाषित आठवले

उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते ।
प्रहाराहारविहार संहारपरिहारवत् ॥

म्हणजे उपसर्गामुळे धातूचा (क्रियापदाचा) अर्थ जबरदस्तीने दुसरीकडेच नेल्या जातो जसा प्रहार, आहार, विहार, संहार, परिहार यांचा अर्थ हार ह्या मूळ क्रियापदाच्या अर्थापासून दूर गेलेला आहे. असो.

मलाही काही शब्दांना समर्पक मराठी शब्द हवे आहेत. कृपया मदत करावी.

टेबल
चार्ट
वर्कशीट
वर्कबुक