वा कविता, छान पाककृती ! मक्याच्या दाण्यांची उसळही चविष्ट लागते. नारळाचा कीस, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर व जरासे आले किसून त्याच्या फोडणीत हे भिजवलेले मक्याचे दाणे चांगले खरपूस लाल होईपर्यंत परतावे. करून बघा.