नमस्कार सोनालीजी,
मुले सगळीकडे सारखीच असतात हो. त्यांना सर्वांत छान मनोरंजन करणार्या मालिका पहायला आवडतात, मस्ती करायला वाव असणार्या ठिकाणी जायला आवडते. स्पायडरमन, बारनी, विनी द पुह या कार्यक्रमांची आकर्षक व हलकीफुलकी मांडणी मुलांना जास्त आकर्षित करते - काही वर्षापूर्वी भारतीय बनावटीच्या "मोगली"ने पण चांगलाच धुमाकुळ घातला होता. आपण घरात पारंपारीक पद्धतीने रामयन-महाभारतातल्या गोष्टी सांगु लागलो अथवा श्लोकपठन करवून घेऊ लागलो तर ते चिडचिड करतात.
अता तुमच्या वैयक्तिक प्रश्नाकडे वळू या. तुम्ही परप्रांतात आहात की परदेशात? तुम्ही दिलेल्या बाकीच्या माहीतीवरुन तरी असे दिसते कि तुम्ही परदेशात आहात. परदेशात असणारी व आपल्या मुलांना आपल्या संपन्न संस्कृतीचा वारसा लाभवा यासाठी धडपडणारी अनेक कुटुंबे मी पाहीली आहेत. त्यापैकी बरेच जन आपापल्या मुलांना स्थानिक मंदिरांमधील कार्यक्रमांना घेऊन जातात. त्याचा बर्यापैकी फायदा होतो. त्यासोबतच अनेक संस्था सुद्धा अपापल्या परीने मदत करतात. या क्षेत्रात मला सर्वांत जास्त भावले ते बालगोकुलम. युरोप/अमेरिकेमध्ये हिंदु लोकसंख्या असणार्या बहुतेक सर्व शहरांमध्ये या बालगोकुलम ची सोय उपलब्ध आहे. त्या कार्यक्रमाशी निगडीत असणारे स्वयंसेवक/समाजसेवक फक्त समाजबांधिलकीतून हा निःशुल्क कार्यक्रम आठवड्यातून एकदा घेतात. त्यात खेळातून, करमणुकीतून, गाण्यांमधून, चित्रकलेच्या व इतर मनोरंजक माध्यमातून श्लोक, धार्मिक/सांस्कृतिक कथा मुलांच्या मनांत नैसर्गिकपणे उतरवल्या जातात. मुलांच्या संस्कारावरही (उदा. आई-वडिलांना नमस्कार का करतात) विषेश लक्ष दिले जाते.
या संकेतस्थळावर बालगोकुलम कार्यक्रम उपलब्ध असणार्या शहरांची जुनी यादी आहे.
http://www.balagokulam.org/centers.html
तुम्हाला जाऊन पहायचे असल्यास अधिक तपशीलवार माहीती तुम्हाला(कोणासही) देण्यास मला आनंद वाटेल.
अपेक्षा आहे "चांगाल्या विचारांची सांगड असणारे हे प्रभावशाली माध्यम" तुम्हाला पण आवडेल.
आपला,
(गोकुळमय) भास्कर