रोहिणीताई,
येथे समोशांची कृती दिल्याबद्दल आभारी.
समोसे हा पदार्थ आवडीचा आहे. दुपारी मधल्या वेळेत किंवा सकाळी पटकन काहीतरी खायला हवे असल्यास समोसा एक छान पदार्थ !
रगडा समोसा व तोही उपनगरीय रेल्वे स्टेशनवरचा खाण्यात एक अद्भुत आनंद आहे. कलकत्त्यांत रुपयाला तीन छोटे समोसे (सिंगाडा) १९९० च्या सुमारास मिळायचे. आम्ही मित्र मंडळी चहा प्यायला गेलो की, दोन चहांत तीन भाग व दोन रुपयाचे सिंगाडे घेतले की, स्वस्त्यात (५ रुपयांत) चहापान आटोपायचं !