शशांकजी,
निषेधाचे पत्र आणि पंतप्रधानांना विनंती करुन काहीही साध्य होणार नाही. असे म्हणतात की, समुहाची स्मरणशक्ती अल्पकाळाची असते. या न्यायानुसार, काही काळाने हा मुद्दाही लोक विसरतील.
मुळात, श्री विलासराव देशमुखांच्या व्यक्तीमत्त्वातच दोष आहे, की त्यांचा निषेध आणि विनंत्या याचा काहीही उपयोग होणार नाही. मुंबै पुराच्या वेळेस कुठे त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या ? महाराष्ट्राला कारण दिले जाते की योजना दाखवा आणि पैसे घ्या. परंतू इतर राज्यांना अशा कोणत्याही अटी न ठेवता सगळी मदत मिळते. कर्नाटकात एवढासा पूर आला तर केंद्राने लगेच मदत पाठवली.
तेंव्हा अशा फुसक्या बारांनी काहीही होणार नाही, दुर्दैवाने.