संग्राहक महोदय,
मुंबईतल्या उच्च न्यायालयाच्या बार कौन्सील ला मात्र मराठीचे वावडे आहे असेही म.टा. मध्ये वाचले होते- कागदपत्रे मराठीत कराव्या लागणाऱ्या खर्चाची वकील लोकांना चिंता आहे - त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या अशिलाला हा अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागेल.
"भरल्या गाड्याला चिपाड्याचे ओझे" ह्यांतला हा प्रकार आहे.
अशिलांकडून दाबून फी घ्यायची, तारखांवर तारखा पाडायच्या, स्वतःच्या क्षमतेबाहेर काम घेऊन सगळ्याच कामांचा विचका करून ठेवायचा व जेंव्हा अशी परिस्थिती येते किंवा न्यायाधीश चापतात तेंव्हा अशिलाच्या मागे लपायचे.
मुंबईतल्या उच्च न्यायालयात मराठीत कामकाजाला सुरुवात झाल्यावर खरे समाधान लाभेल.