पातळ पोह्यात तेल, बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ, साखर, लिंबू आणि कोथिंबीर घालून त्यावर झाकण ठेवून झाकणावर वजन ठेवतात. अशा प्रकारे 'दडपलेले' पोहे कांद्याच्या वाफेने मऊ पडतात. आंबट, गोड, तिखट आणि तेलाची चव, त्यावर कच्ची कोथिंबीर लज्जत वाढवते.