स्क्रू ला मळसूत्र हा शब्द माझ्या जास्त परिचयातला आहे. गॅसला नुसतेच वायू म्हणावे असे वाटते. हँडलला मूठ म्हटले तर कसे वाटेल? छत्रीची मूठ असे आपण म्हणतोच. स्वेटरला स्वेदशोधक म्हटले आहे. ते स्वेदशोषक म्हणायचे आहे का? स्वेटर असेच म्हणायलाही हरकत नसावी.
माझ्या मते रूढ झालेले शब्द तसेच वापरायला हरकत नसावी. मात्र त्यावर मराठी व्याकरणाचे संस्कार करावेत. जसे टेबलावर (टेबलवर नाही), स्वेटराचा रंग(स्वेटरचा नाही.)