"वडबापू!" हा एक प्रचलित शब्द आहे. प्रत्यक्षात "ओढ बापू" चा अपभ्रंश.

"ओढ" चा अर्थ संदर्भानुसार घ्यावा. खाताना "ओरप" (अर्थात आवडीने आणि भरपूर खा) असा घ्यावा, पिताना मनस्थितीप्रमाणे कसाही ;)

"वडबापू!" मेजवानीच्या सुरुवातीला "चिअर्स" ऐवजी म्हणता येईल. एकसुरात म्हणून तर पाहा.

आजकल "वडबापू" विशेषण म्हणूनही वापरला जातो असे आमच्या ऐकण्यात आले आहे, जसे "काय 'वडबापू' जेवण होते!" वगैरे.

चला तर मग हा शब्द वापरून पाहा.

आपला,
(शब्दयोजक) शशांक