भारनियमनावर मात करण्यास शेणापासून वीज़निर्मिती ही बातमी आवर्ज़ून वाचावी अशी आहे.
संक्षिप्त बातमी -
- करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील मारुती व दत्तात्रेय श्रीरंग चव्हाण ह्यांनी तसेच बारामती तालुक्यातील सोमेश्वरनजीकच्या मुरूम येथील श्री० विजयसिंह बबन जगताप व हंबीरराव बबन जगताप ह्या शेतकरी बंधूंनी शेणापासून वीज़निर्मिती करण्यात यश मिळवले.
- मुरूम येथे दोन घनमीटरचा गोबरगॅस प्रकल्प वीस वर्षांपासून चालू आहे. त्यातून २६ किलोग्रॅम एल पी जी इतकी उर्जा मिळते.
- सकाळी ५० किलो व संध्याकाळी ५० किलो शेण लागते. त्यातून आता दररोज़ तीन तास वीज़निर्मिती होत आहे. त्यावर गोठ्यातील चारा कुट्टी यंत्र, गोठा धुण्यासाठी तीन अश्वशक्तीची मोटर, पिठाची गिरणी इत्यादी चालते.
- लवकरच बारा तास वीज़निर्मिती व त्यातून शेतीला पाणी देण्याचा भरवसा.
- लवकरच शेतीसाठी वीज़ विकत घेणे बंद करून 'स्वयंपूर्ण शेतकरी' होण्याचा मनोदय.
- गोबरगॅसमधून बाहेर पडणारी शेणाहून उच्च प्रतीची रबडी शेतात वापरली ज़ाते.
- गोठ्यातील मलमूत्र 'संजीवक' म्हणून शेतात वापरण्यास सुरुवात.
आपला
(शेणप्रेमी) प्रवासी