गार्गी,

सामोश्यांच्या तयार पट्ट्या बाजारात मिळतात असे ऐकले आहे, पण अजुन मी बघितलेल्या नाहीत, त्या पट्ट्या कदाचित जाड असतील. पट्ट्या पातळ कराव्यात म्हणजे त्या कुरकुरीतही होतात आणि तळताना कच्च्या रहात नाहीत. काहीजणी ह्या तयार झालेल्या पट्ट्या अगदी थोड्या वेळ तव्यावर भाजून घेतात. मी कधीही भाजुन घेतल्या नाहीत, त्यात वेळ खूप जातो. तसे सामोसे बनवणे हे एक वेळमोडे काम आहे. 

रोहिणी