ज्याला उपमा द्यायची आहे ते उपमेय.
ज्याची उपमा देता येऊ शकते ते उपमान.
उपमेय आणि उपमान यांच्यातील नातेसंबंधांवरून शब्दालंकार ठरतो असे वाटते.
उदा०
उपमेय हे उपमानासारखे आहे - उपमा
उपमेय जणु उपमान वाटते आहे - उत्प्रेक्षा
उपमेयाचा उल्लेखही न करता उपमानाचे वर्णन - रूपक
उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे - अपन्हुती
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी.
उपमेय हे उपमानाहूनही श्रेष्ठ आहे - व्यतिरेक
अमृताहुनी गोड नाव तुझे देवा.
उपमेयाला उपमेय हेच केवळ उपमान असू शकते - अनन्वय
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.
झाले बहु, होतिल बहु, परंतु यासम हा.
चू भू द्या घ्या
आपला
(उप) प्रवासी