मला वाटते 'अतिशयोक्ती' हा अलंकार अजून प्रतिसादांत आला नाही. म्हणून त्याबद्दल लिहीत आहे.

एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फ़ुलवून सांगणे.

"दमडीभर तेल आणलं,

स्वारींची आंघोळ झाली,

सासूबाईंचं न्हाणं झालं,

मामंजींची दाढी झाली,

भावोजींची शेंडी झाली,

उरलं तेल झाकून ठेवलं,

लांडोरीचा पाय लागला,

वेशीपर्यंत ओघळ गेला,

त्यात ऊंट पोहून गेला."

(आठवते तसे लिहिले. सुधारणा असल्यास सुचवाव्या.)