मफलर या शब्दाचा अजून एक अर्थ वाहनाचा सायलेन्सर असाही होतो. (विशेषतः अमेरिकेत - येथे सायलेन्सर हा शब्द कळत नाही, व सायलेन्सरसाठी मफलर ह एकमेव शब्द प्रचलित आहे.)

तेव्हा 'थंडीत गळ्याभोवती गुंडाळण्याचे लोकरी वस्त्र' या अर्थाने मफलरसाठी उष्ण उपरणे/उबदार उपरणे/गरम उपरणे/लोकरी उपरणे हे शब्दप्रयोग ठीक आहेत. परंतु 'वाहनाचा सायलेन्सर' या अर्थाने मफलरसाठी कोणता शब्द योजता येईल?

- टग्या