विसोबा, चक्रपाणि, कुमार, मैना, अजब
आभार.
तानाजी, बाजी प्रभू , दादोजी तुम्हा
औरंग्याची साथ देताना पाहिले
चांगल्या व्यक्तींबद्दल हे वाईट स्वप्न का पडावं? चांगल्या प्रवृत्ती कायम चांगल्याच असतात असं मला वाटतं.
- कुमार
कुमारजी,
ऐतिहासिक आणि पौराणिक
व्यक्तींची नावं रूपकं म्हणून वापरण्यावरून यापूर्वीही अनेकांनी माझ्या
लिखाणावर आक्षेप घेतलेला आहे. मी वेळोवेळी त्यास हेच उत्तर देत आलो आहे -
ही नावं मी त्या महनीय व्यक्तींचा अनादर करण्यासाठी वापरत नाही तर
सद्यकाळातील रूपकं म्हणून वापरतो.या कवितेतील तानाजी, बाजी,आणि दादोजी हे
इतिहासातील खरे तानाजी इ. नाहीत तर सांप्रतची काही मंडळी आहेत हे उघड
आहे.जोवर माझं मन याविषयी स्वच्छ आहे तोवर मी अशी रूपकं वापरत राहणार.
मिलिंद