सुदर्शन,
गेली साडेचार वर्षे मी द.कोरियात ज्या ज्या ठिकाणी राह्यलो, तिथे कुठेही मराठी माणसांचा गोतावळा नव्हता. काही ठिकाणी तर भारतीयच नव्हते. सध्या माझा एक मराठी मित्र १५ किमी.वर तर दुसरा १५० किमी.वर राहतो. अन्यथा अख्ख्या देशात इथेतिथे विखुरलेली नि काही काही महिन्यांसाठीच आलेली काही मराठी माणसं आहेत असं केवळ माहीत आहे. कुटुंबं तर नाहीतच. त्यामुळे तुम्ही म्हणता तसा अनुभव मला मराठी माणसांबाबतीत येणं शक्य नाही. तुम्ही भाग्यवान की तुमच्या आजूबाजूला अशी तक्रार करायला तरी मराठी लोक आहेत!
पण तुम्ही म्हणता तसा अनुभव मी चेन्नई वगैरे महाराष्ट्र मंडळांत १९९७-९८मधे घेतला आहे. तिथे तर मंडळाच्या कार्यक्रमांत येऊन मराठी कंपूत इंग्लिश फ़ाडणारे मराठी महाभाग होते.
तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत मी लालूशी सहमत आहे.
माझ्या हापिसात समोरच्या मेजावर बसणारा माझा एक मल्याळी सहकारी आहे. हा पठ्ठ्या माझ्याशी बोलतच नाही. कारण काय - तर काहीही नाही. कोरियन सहकाऱ्यांबरोबर तो स्वतःहून थट्टामस्करी करेल, पण एक वर्ष माझ्या समोर बसूनही आजवर एकदाही त्याने माझ्याशी बोलायला तोंड उघडलेलं नाही. दोन भारतीयांनी इंग्रजीत बोललेलं कोरियन लोकांच्या फ़ार डोळ्यांत येतं म्हणून आपण हिन्दीत जास्तीत जास्त बोलावं असं मी त्याला सुचवलं होतं. त्यामुळे कदाचित त्याचं बिनसलं असेल असं मला वाटे. पण त्याला हिन्दी येत नाही वा आवडत नाही असाही काही भाग नाही. केवळ मराठी भाषिकच नाही, तर एकंदरच देशाबाहेरील भारतीयांनी एकमेकांमधला 'आत्मभाव' [fellow feeling] गमावलेला आहे हीच खरी गोष्ट आहे.