एवढेच नाही, मनाविरुद्ध असला तरी अमराठी लोक पाठिंबा त्यांच्याच माणसाला देतात, पण मराठी माणसांचा पाठिंबा मुळातच विश्वासहीन असतो, आता शिवसेनेचंच उदाहरण घ्या ना !!
हे तर मराठी माणसाच्या वैचारिकतेचे प्रदर्शन आहे. मराठी माणूस विचार करून ठरवतो कोणाला पाठिंबा द्यायचा ते. म्हणूनच शिवसेनेला जेव्हा महाराष्ट्रात सत्तेचा सदुपयोग करण्यात अपयश आले(दुरुपयोग करण्यात प्रमाणाबाहेर यश मिळवले!), तेंव्हा मराठी माणसाने त्यांना नंतरच्या निवडणुकीपासून सत्तेपासून दूर ठेवले. (शिवसेनेचा आपण उल्लेख केलात म्हणून मीही केला!) माझ्या मते यात चुकीचे असे काहीच नाही. लोकशाहीत प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि मराठी माणूस त्याचा पुरेपूर उपभोग घेत आहे.
अमेरिकेत काही वर्षे काम केल्याने मी असे अनुभवले की मराठी माणूस, पाश्चात्य लोकांबरोबर फार चांगले जमवून घेऊ शकतो कारण त्याला मैत्रीसाठी समभाषिक व्यक्तीची गरज लागत नाही. या गोष्टीचा दक्षिण-भारतीयांमध्ये अभाव आढळतो.
माझ्या मते हे मराठी माणसाच्या प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे याला आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही.
--ध्रुव.