अगस्ती,
तुझा प्रतिसाद वाचून झाला आणि तू फोनही केलास. ह्याहून छान प्रतिसाद तो काय? शक्य तेवढे मला समजेल आणि इतरांना वाचायला आवडेल असे लिहिण्याचा मानस आहे. तुझा प्रतिसाद वाचून तो हेतू सफल होतो आहे असे वाटते.
श्रावणी आणि तात्या,
लिखाणानंतर तुम्हा दोघांची टिपणी हवीच असते.
श्रावणी,
१४ लोक जे दिलेत ते खालीलप्रमाणे आहेत.
१.भूर, २.भूवर, ३. स्वर्ग, ४.महर, ५. जन ६. तपो ७. सत्य
८. अतळ, ९.वितळ, १०. सुतळ, ११. तळातळ, १२.महातळ, १३.रसातळ आणि १४.पाताळ
तात्या,
शिर्डीला जाऊन आलेल्या मित्रपरिवारामधला संवाद आहे तो. एकदम जीवंत!
प्रवासीमहोदय,
आपण वाचता आहात हेही खूप आहे.
असाच लोभ राहू द्या आणि हरिपाठ पूर्ण होऊ द्या.
सद्गुरूचरणी एवढीच मागणी आहे.