वरदा,
लेख चांगला आहे. एका दमात वाचला पण पहिल्या लेखाच्या मानाने थोडा अधिक विचार करावा लागला.
लेख वाचल्यावर आपण नक्की काय काय वाचले हे डोक्यात आले नाही. त्यामुळे उज़ळणी करणे आवश्यक वाटले. परिच्छेदांना उपशीर्षके दिली व लेखनात आणखी सुसूत्रता आणली तर हा प्रश्न सुटू शकेल असे वाटते.
ह्या ढगांच्या खालच्या भागात ऋण तर वरच्या भागात धन प्रभार असतो
असे का असते हे कळले तर लक्षात ठेवणे सोपे होईल. अर्थात हे प्रस्तुत लेखमालेच्या मर्यादेबाहेर असले तर राहू दे.
सक्रिय गर्जनाकारी ढगांमध्ये वरच्या भागात +२४ कूलंब (Coulomb), खालच्या भागात -२० कूलंब तर तळाशी साधारण +४ कूलंब एवढा प्रभार असतो.
हे वाक्य वरील उद्धृत वाक्यापेक्षा थोडी वेगळी माहिती सांगत आहे. पुन्हा तळाशी धनभार का असावा बरे?
एकूण लेख छानच आहे. आम्हाला ह्यातले फारसे काही कळत नाही त्यामुळे प्रतिसादात काही चुकले असल्यास क्षमा असावी.
आपला
(अज्ञ) प्रवासी