प्रवासी महाशय,

लेख चांगला आहे. एका दमात वाचला पण पहिल्या लेखाच्या मानाने थोडा अधिक विचार करावा लागला.

--- लेख शास्त्रीय विषयावर असल्याने लेखक्रमांक वाढत जाईल त्यानुसार क्लिष्ट्ताही वाढत जाते. सोप्याकडून क्लिष्टाकडे अशीच रचना शात्रीय लेखांसाठी करावी लागते. क्लिष्ठता अजिबात नाकारायची म्हटली तर लेख माहितीपूर्ण होणार नाही, उथळ होईल.

लेख वाचल्यावर आपण नक्की काय काय वाचले हे डोक्यात आले नाही. त्यामुळे उज़ळणी करणे आवश्यक वाटले. परिच्छेदांना उपशीर्षके दिली व लेखनात आणखी सुसूत्रता आणली तर हा प्रश्न सुटू शकेल असे वाटते. 

------ पुढील भागांमध्ये वरील सूचना लक्षात घेऊन लेखन करेन. धन्यवाद.

ह्या ढगांच्या खालच्या भागात ऋण तर वरच्या भागात धन प्रभार असतो

असे का असते हे कळले तर लक्षात ठेवणे सोपे होईल. अर्थात हे प्रस्तुत लेखमालेच्या मर्यादेबाहेर असले तर राहू दे.

-------- असे का असते हे सांगणारे एकापेक्षा जास्त सिद्धांत आहेत. त्यामुळे असे का असते ह्याचे समजेलसे उत्तर द्यायचे ठरविले तर तो मेघभौतिकशास्त्राचा एक धडाच लिहिल्यासारखे होईल. त्यामुळे मी त्याचे उत्तर प्रस्तुत लेखमालेच्या मर्यादेबाहेर असल्याचे लिहिले आहे.

सक्रिय गर्जनाकारी ढगांमध्ये वरच्या भागात +२४ कूलंब (Coulomb), खालच्या भागात -२० कूलंब तर तळाशी साधारण +४ कूलंब एवढा प्रभार असतो.

हे वाक्य वरील उद्धृत वाक्यापेक्षा थोडी वेगळी माहिती सांगत आहे. पुन्हा तळाशी धनभार का असावा बरे?

-------- आकृती १ मध्ये तळाशी कमी प्रमाणात असलेला धनभार दाखविलेला आहे. प्रभार कमी किंमतीचा व कमी भागात पसरलेला असल्यामुळे, धन-ऋण विभागांमधील विभवांतर फारसे नसल्याने हा धनभार विद्युत विप्रभारणात फारसा भाग घेत नाही.

प्रतिसादार्थ धन्यवाद. पुढील लेखांमधीलही काय आवडले नाही ते स्पष्ट सांगावे ही विनंती.